मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थाजवळील स्फोटके, तसेच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सहभागी संशयित मर्सिडीज कार राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) सीएसटी परिसरातून जप्त केली आहे. याशिवाय याप्रकरणी सचिन वाझे यांच्या सीआययू कार्यालयात एनआयएने शोध मोहिम राबवली असून वाझे यांचा मोबाईलसह कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत गुन्हे शाखेच्या सात पोलिसांची चौकशी एनआयएने केली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी एनआयएने पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. तर, तपास सुरु असतानाच एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. एनआयए मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे प्रकरणात एका इनोव्हा कारची माहिती समोर आल्यानंतर आता एक मर्सिडीज कार जप्त केली आहे. या कारमधून वाझे हे मनसुख हिरेनला भेटले असून त्यावेळी स्कॉर्पिओ कारच्या चाव्या हिरेनकडून घेतल्या असल्याचा एनआयएला संशय आहे. प्रत्यक्षात ही कार चोरी झालीच नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएला मर्सिडीज कारचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरील आहेत. या मर्सिडीजमध्ये मनसुख हिरेन बसले होते, असे समोर आले आहे.
सीसीटीव्हीनुसार, मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पाहत होते. त्यानंतर काही वेळानंतर ही मर्सिडीज कार आली आणि त्यात बसून ते निघून गेले. ती कार वाझे हेच वापरत असल्याचा एनआयएनला संशय आहे. एनआयएच्या अधिका-यांनी या कारची तपासणी केली. त्यात काही शर्ट, पैसे आणि बाटली (ज्यामध्ये पाणी अथवा रॉकेल आहे.)सापडली आहे. याच कारमधून पीपीई किटही नेण्यात आल्याचा संशय आहे.
एनआयएच्या अधिका-यांनी सोमवारी रात्री पोलिस मुख्यालयातील सीआययूच्या कार्यालयात शोध मोहिम राबवली. पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या या शोधमोहिमेत वाझे यांच्या मोबाईलसह कागदोपत्री पुरावेही जप्त केले आहेत. याशिवाय वाझे यांच्या इमारतीतील डीव्हीआर जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आतापर्यंत गुन्हे शाखेच्या 7 पोलिसांची चौकशी
एनआयएने आत्तापर्यंत गुन्हे शाखेच्या 7 पोलिसांची आतापर्यंत चौकशी केली आहे. त्यात एक सहाय्यक पोलिस आयुक्त, एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि दोन चालकांचा समावेश आहे. त्यातील पोलिस अधिकारी रियाज काजी यांची तिस-यांदा चौकशी करण्यात आली. याप्रकरणी इनोव्हा कारही चालवणाराही पोलिस असल्याचा संशय एनआयएला संशय असून त्याची चौकशीही एनआयएने केल्याचे सूत्रांनी सांगितले.
------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Documents and digital evidence along with Sachin Waze mobile seized by nia
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.